बोदवड महविद्यालयाला भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयकडून स्वच्छता कार्यरत संस्था म्हणून मान्यता

0

बोदवड (प्रतिनिधी): – भारत सरकारची स्वच्छता अभियान ही मोहीम सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. जनतेत स्वच्छते प्रति जनजागृती निर्माण करण्यासाठी या योजनेची सुरुवात शासनाने केली आहे. स्वच्छता ही केवळ आपल्या घरा पुरती मर्यादित न ठेवता देशालाही स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ रोजी सुरु केली आहे.त्यांनी देशातील सर्व लोकांना एकत्र करुन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

आमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली.महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढयामध्ये जसे ब्रिटिशांनी भारत सोडायला सांगीतले तसेच सर्व भारतीयांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला.महात्मा गांधीजीनी त्यावेळी जनतेला प्रेरित केले.परंतु स्वच्छ भारत हे त्याचं स्वप्न अपूर्ण राहीले.त्यांचे स्वप्न सर्व भारतीयांनी पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयात स्वच्छते साठी वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी शासन प्रोत्साहन देते.त्यातलीच एक योजना “स्वच्छता कार्यरत संस्था” म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद,उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय,भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या  योजनेंतर्गत कोविड -१९ या उद्भवलेल्या महामारीनंतर महाविद्यालयाने केलेल्या तयारीचा उल्लेख केलेला होता. त्या योजनेचे पाच विभागात स्यानिटायझेशन व हायजीन, वाटर मनेजमेंट,वेस्ट मनेजमेंट, एनर्जी मनेजमेंट व ग्रीनरी असे विभाजन करण्यात आलेले होते.      कला वाणिज्य व विज्ञान माविद्यालय बोदवडचे प्राचार्य  प्राध्यापक अरविंद चौधरी व उप-प्राचार्य प्रा.डी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ.क्यू.ए.सी. समन्वयक तथा रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल बारी यांनी सदर योजनेचा प्रस्ताव व व पाचही विभागात महाविद्यालयाने राबविलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल क्षणचित्रासह व नियोजन,स्वतंत्र समिती स्थापना तसेच कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालयाने केलेल्या उपाय-योजनाचा प्रामुख्याने उल्लेख करून महाविद्यालयाने प्रस्तावाच्या स्वरुपात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषद,उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन मंत्रालय व आताचे शिक्षा मंत्रालय,भारत सरकार यांना सादर केला.या योजनेचे समिती अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी आहेत तर सदस्य म्हणुन डॉ.अनिल बारी,डॉ.रुपाली तायडे, सौ. कंचन दमाडे,श्री.नितेश सावदेकर व डॉ. गीता पाटील यांची नियुक्ती केलेली आहे.महाविद्यालयाने कोरोणा विषाणू (कोविड-१९) संसर्ग पार्श्वभूमी विचारात घेता साथरोग प्रतिबंधक नियमांचे व वेळेवेळी शासन,विद्यापीठ व स्थानिक प्रशासन यांचे निर्देश पाळत असल्याचे सुद्धा त्या मध्ये उल्लेख होता.

सदर संस्थने महाविद्यालयाची उलटतपासणी करून त्याची सत्यता पडताळणी करून महविद्यालयास अँक्षण प्लान इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता दिली. डॉ.वी.जी.प्रसन्ना कुमार  चेअरमन यांच्या स्वाक्षरीचे मान्यतेचे प्रमाणपत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले.

अँक्षण प्लान इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता मिळाल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य,उप-प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री.मिठूलालाजी आग्रवाल,उप-अध्यक्ष श्री. अजयाजी जैन,सचिव श्री. विकासजी कोटेचा व सर्व संस्था चालकांनी केले.असे प्रसिद्धी प्रमुख श्री.जितेंद्र शर्मा यांनी कळविले आहे.

महाविद्यालय व परिसर स्वच्छते साठी प्रारंभापासूनच कार्यरत आहे व प्राधान्य दिले आहे स्वच्छतेसाठी आम्ही सर्वच झटत आहेत.स्वच्छ महाविद्यालय म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात यश प्राप्त झाले आहे.आतापर्यंत महाविद्यालयास्तरीय कोरोना प्रतिबंधक,स्वच्छता व व्यवस्थापनापसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांना भारत सरकारने मान्यता देणे हे अभिमानास्पद बाब आहे असे याबाबत बोलतांना महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य अरविंद चौधरी,यांनी सांगितले तर भारत देशाला स्वच्छ भारत बनवण्यास प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आपल्या महाविद्यालया पासून सुरुवात करून देशाची पण साफ – सफाई करण्याचा संकल्प मना मध्ये ठेऊन प्रस्ताव सादर केला होता व त्याला मान्यता मिळाल्याने आनंद झाला असे मत डॉ.अनिल बारी,समिती सदस्य यांनी याबाबत बोलतांना सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.