बोदवड आठवडे बाजार बंद असतानाही दुकाने थाटल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल

0

बोदवड (प्रतिनीधी) : शहर तथा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बोदवड नगर पंचायत प्रशासनाने साथरोग नियंत्रण कायद्यानूसार बाजारात व्यवसाय थाटून बाजार न भरविण्याची सुचना दिली आहे.मात्र या सुचनेचे पालन न करता आठवडे बाजारात आपली दुकाने थाटून स्थानिक प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याने शहरातील पाच जणांवर नगर पंचायत कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून शहरातील आर.एन.बागवान,योगेश नारायण माळी,शाहरुख खान मज्जीद खान,सै.अरबाज सै.रहिम बागवान,रामदास रामचंद्र तुरे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील आठवडे बाजार बुधवारी असतो.मात्र शहर तथा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने साथरोग नियंत्रण कायद्यानूसार आठवडे बाजार बंद आहे.

मात्र येथील पाच जणांनी याकडे दुर्लक्ष करत बाजारात दुकाने थाटत तसेचं तोंडाला मास्क न बांधता व दुकानांमध्ये ठराविक अंतर न ठेवता जिल्हाधिका-यांच्या आदेशांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केल्याने वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढिल तपास बोदवड पोलीस स्टेशनचे हवालदार कालिचरण बि-हाडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.