असिस्टंट लाईनमन विक्रम महाजन यांचा सेवापुर्ती ऋणानुबंध कार्यक्रम सोहळा संपन्न

0

भडगाव (प्रतिनिधी) : बनोटी ता. सोयगाव शाखा अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादित बनोटी शाखेत विक्रम गंगाराम महाजन असिस्टंट लाईनमन या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाखेचे अभियंता दिनकरराव कुंदे तसेच प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब माळी, गौर, एच. एम. राठोड हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून विक्रम महाजन यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्यावतीने विक्रम महाजन यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले.

प्रामाणिकपणा व नियमितपणा हा सेवापुर्ती कार्यक्रमात निरोगी आयुष्याचा मूलमंत्र देतो असे प्रतिपादन अभियंता दिनकर राव कुंदे यांनी केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक सुरेश माळी (वेरूळ) दीपक महाजन (भडगाव) नंदू बापू साळुंखे, एच एम राठोड, एम आय एम संघटनेचे आखिर दादा शेख, कुशलकुमार माळी, वैष्णवी महाजन यांनी आपल्या मनोगतातून विक्रम महाजन यांचा कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू बापू साळुंखे तर आभार प्रा.डॉ. नितीनकुमार माळी यांनी केलेले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्युत महावितरण कंपनीचे सर्व कर्मचारी डॉक्टर शरद महाजन व महाजन कुटुंबीय यांनी घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.