बोदवडला कोणी डॉक्टर देता का डॉक्टर…?

0

बोदवड (सुनिल बोदडे) :- शहर तथा तालुक्यातील काही ग्रामीण भागात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ वर पोहचली आहे.त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक वर्षापासून बोदवड तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र गेल्या वर्षी वरुणराजाने कृपा केल्याने इतर वर्षांपेक्षा या वर्षी परिस्थिती जरा बरी आहे.

बोदवड तालुका ५२ खेड्यांचा तालुका असून तालुक्यातील सामान्य जनता प्राथमिक उपचार घेण्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात येत असतात.मात्र दुदैव असं की,कोरोना संकटकाळातही येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने परिणामी गेल्या वीस दिवसांपासून येथील ओपीडी बंद अवस्थेत आहे.त्यामुळे खेड्यापाड्यातील गोरगरिब जनतेला डॉक्टर नसल्याने ओपीडी बंद असल्याने खालीहात माघारी जावं लागतं असतं.

गेल्या ५ जून म्हणजे तब्बल २० दिवसापासून येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नसल्‍याचे उपचार कुठे करावे ?असा पेच नागरिकांना उभा राहतो.येथील रुग्णालयात एकुण ३० आरोग्य कर्मचारी आहेत.मात्र एमबीबीएस डॉक्टरच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णालय असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बोदवड तालुक्यात कोरोना संकट उभे असताना येथील रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने बोदवड ग्रामीण रुग्णालयात कोणी डॉक्टर देता का डॉक्टर?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.