बेंडाळे महाविद्यालयाजवळ पोलिसांनी हटविले अतिक्रमण

0

निर्भया पथकाची कारवाई नसल्याने : रोडरोमीओंचा सुळसुळाट

जळगांव.दि.9-
शहरात शाळा महाविद्यालयीन परीसरात गोळया बिस्कीट, गोला, पावभाजी अशा अनेक खाद्यपदार्थांची दुकानांच्या आडून शाळा बाह्यव्यक्तिचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. याच किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांचा फायदा रोडरोमीओचा घेत असल्याचे लक्षात आल्याने शनिवार सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलिस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली.
शहर परीसरात मुख्य रस्त्यांवर अनेक शाळा महाविद्यालये असून यांच्या परीसरात अनेक लहान मोठे व्यावसायीकांची दुकाने आहेत. यासह गोळ्या चॉकलेट वा अन्य चटपटीत खाद्यपदार्थांची दुकाने देखिल सुरू आहेत. बेंडाळे महिला महाविद्यालयाजवळ हस्तकला कुसरीच्या विक्रि केंद्रासह मुलींच्या वापरात असणार्‍या कॉस्मेंटिक, पिन, नकली ज्वेलरीचे दुकाने देखिल आहेत. शाळा महाविद्यालयाशी संबंध नसलेले टवाळखोर युवक या दुकानांच्या आडोशाने या परीसरात तासनतास घुटमळत असतात. एवढेच नव्हेतर रस्त्याच्या विरूद्ध दिशेने पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे भरवेगात दुचाकी पळवितात. यामुळे अनेक वेळा पायी चालणार्‍यासह इतर वाहनचालकांना देखिल त्रासाला सामोर जावे लागते. तत्कालीन पोलिस अधिक्षक सुपेकर आणि दत्तात्रय कराळे यांच्या कार्यकाळात निर्भया पथक कार्यरत होते. परंतु काही काळापासून निर्भया पथकाकडून काहिसे दुर्लक्ष होत असल्याने या महाविद्यालय परीसरात टवाळखारोंचा वापर वाढला आहे.
शहर परीसरात ठिकठिकाणी अतिक्रमण हटवितांना दुकाने घरे, ईमारतीचे ओटे तोडण्याची कारवाई होत आहे. परंतु शाळा महाविद्यालयीन परीसर वा मुख्य रस्त्यांवरील हि खाद्य पदार्थांची दुकानांकडे मात्र या कारवाईत दुर्लक्ष केले जाते. याचाच फायदा टवाळखोर घेतात हे चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.