बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करा -डॉ. अभिषेक ठाकूर

0

जळगाव |  सेवेत बीएएमएस असो की एमबीबीएस आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी असो, दोघांच्याही कामाच स्वरुप समानच असत व सारख्याच जोखमीचे काम करावे लागते . त्यामुळे  बीएएमएस डॉक्टरांच्या  मानधनात वाढ करून देण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संस्था/ संघटना संस्थापक तथा राज्याध्यक्ष-   डॉ.अभिषेक प्रमोद ठाकुर यांनी संस्थापक उपाध्यक्ष- डॉ.दत्तात्रय साळुंखे (सोलापुर)आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे केली आहे .

वास्तविक पाहता समान काम समान वेतन देण अपेक्षित आहे,. परंतु सुधारीत मानधन वाढीत सरकारने बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट- अ यांच्या मानधनात काहीही वाढ दिलेली नसल्याने महाराष्ट्रातील सर्व बी.ए.एम.एस.तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात अन्याय झाल्याची भावना असुन असंतोष निर्माण झाला आहे.

शासकीय सेवेतील भवितव्याची कुठलीही शास्वती नसतांना  कर्तव्याची जाण ठेऊन आम्ही कोराना सारख्या साथ उद्रेकात जीव धोक्यात घालुन काम करत आहेत.

त्यामुळे राज्यसरकार ने बीएएमएस कंत्रांटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता आमच्या मानधनात वाढ करुन त्यासोबतच पुढील सेवेचा बॉण्ड देखील रीन्युव्ह करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल आताच उचलावीत अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविलेल्या निवेदनात  वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संस्था/ संघटना संस्थापक तथा राज्याध्यक्ष-   डॉ.अभिषेक प्रमोद ठाकुर यांनी केली आहे . निवेदनावर डॉ.विनय ए.चौधरी,  डॉ.अमोल उ.माने डॉ.उमेश ग.कराळे,डॉ.संगीता रा.मेढी, डॉ.मोनाली अ लोणकर डॉ.विना काकडे,डॉ.राहुल तु.विधाते , डॉ.गोवींद भा.लंगोटे , डॉ.वसिम पठाण, डॉ.चेतन म्हात्रे , डॉ.पिनाक चिवटे, डॉ. रविंद्र ढेरंगे  , डॉ.निर्भय लोकेंद्रसिंग ,डॉ .प्रितमसींग ठाकुर डॉ.सुनिल गाडे , डॉ.वंदन वेंगुर्लेकर ,डॉ.प्रविण धावडकर ,डॉ.आशिष ठिगळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.