बाजरी काढण्यास गेलेल्या महिलेचा थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू

0

खेडगाव येथील दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ
भडगाव- बाजरी काढणीसाठी शेतात गेलेल्या विवाहितेचा पदर थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने विवाहिता ओढली जावून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खेडगाव येथे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली . याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की खेडगाव येथील रहिवाशी सोनी श्रावण मोरे (वय 25) या भिका जयराम पाटील यांच्या शेतात बाजरी काढण्याचे काम सुरू असताना त्यांच्या साडीचा पदर मशीनमध्ये अडकला व गंभीर मार लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली . याघटनेनंतर खेडगावात शोककळा पसरली. मृत महिलेच्या पश्‍चात सहा महिन्यांचा चिमुरडा मुलगा व दोन मुली असा परीवार आहे. सोनी मोरे या खेडगाव येथे वडील चैत्राम सोनवणे यांच्याकडेच वास्तव्यास होत्या.पी.एस.आय. जाधव व कोळगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवचिकित्सेसाठी भडगाव येथे पाठविण्यात आले.याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते .

Leave A Reply

Your email address will not be published.