फॅन्सी आणि बिना नंबर प्लेटच्या दुचाकींवर पोलिसांची धडक कारवाई

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

फॅन्सी नंबर प्लेट तसेच  विना नंबर प्लेट भरधाव दुचाकी चालविणाऱ्यांविरुध्द प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी  शहर वाहतुक पोलीस पो.हे.काॅ. शाम शिरसाट, पो.हे.काॅ. महेश चोपडे, पो‌.काॅ. गजानन काळवाघे, ए. एस. आय रमेश सोळंके, ए.एस.आय. जुम्मा तडवी, पो.काॅ अढाव यांच्यासमवेत शहरातील तहसील चौक, हनुमान चौक, टि पाॅईन्ट, बसस्थानक परिसरात मोहिम राबविली.

या मोहिमेत 21 फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी पोलिसांनी शहर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून फॅन्सी नंबर असलेल्या दुचाकी धारकांविरुद्ध कलम 267 प्रमाणे कारवाई करुन त्यांच्या कडून दंड वसुल करुन आरटीओंच्या नियमानुसार दुचाकी धारकांना नंबर प्लेट बनवुन आणायला लावुन मोटार सायकल मॅकेनिकल बोलावून फॅन्सी नंबर प्लेट तात्काळ पो.स्टे आवारातच बदलविण्यात आल्या.

आरटीओंच्या नियमानुसार वाहनधारकांनी नंबर प्लेट लावाव्यात, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.