फसवणूक करून ट्रक चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

0

पाचोरा -( प्रतिनीधी)- ट्रक मालकाची फसवणूक करून बनावट नंबरने रजिस्टेशन करून विक्री करणार्या गुन्हातील आरोपीला पाचोरा पोलीसानी कल्याण येथुन अटक केली .
या बाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहीती नुसार दि.१०- ६ – २०१८ रोजी पाचोरा शहरातील अनिल प्रकाश मोर रा. पाचोरा यांची मालकीची ट्रक क्रमांक एम . एच . १८ ए.ए. ९०६० हि आरोपी यांनी नोटरी करून फायनासाने हप्ते भरण्याच्या विश्वासाने सदर ट्रक आरोपीनी घेतली होती .आरोपीनी नोटरी केल्याप्रमाणे ट्रकचे कोणतेही हप्ते न भरता नमूद ट्रकचे बनावट रजिष्टर बुलढाणा आर .टी.ओ कार्यालयाकडून परस्पर विल्हेवाट लावली . म्हणून अनिल प्रकाश मोर यांच्या तक्रारी ने पाचोरा पोलीस स्टेशनात भाग – ५ गु.र.नं ५३/२०१८ भादवि कलम ,४२०,४०६,४६५,४६८ प्रमाणे दि.५/५/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसापासुन  गुन्हातील आरोपी समिरखान नासिरखान पठाण राहणार खंडाळा ता.वैजापूर जि.औरंगाबाद हा फरार होता पोलीस त्याचा वारंवार शोध घेत होते परंतु तो पोलीसाना वारंवार हुलकावणी देत होता. नमुद गुन्हातील फरार आरोपी यास मा.जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे , अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पो.काँ . प्रशांत चौधरी, पो.का. अमृत पाटील पो. काँ. विजय पाटील , यांनी दि .२१/६ /२०१८ रोजी कल्याण येथुन अटक केली आहे .सध्या आरोपी कडून अधिक माहिती पोलीस कोठडीत आहे . विचारपुस करण्यात येत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.