“प्रतिभा वाचवा देश वाचवा” च्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट

0

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील “प्रतिभा वाचवा देश वाचवा “(Save Merit Save Nation) तर्फे डॉ. प्रदीप नाईक, डॉ. नितीन दावालभक्त, डॉ. सौ. अर्चना खानापूरकर, राधेश्याम लाहोटी, पं रवी  ओम शर्मा आदी भुसावळ प्रतिनिधी यांनी शनिवार रोजी  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाजनादेश यात्रे दरम्यान भुसावळ येथील हॉटेल राधाकृष्ण येथे मुक्कामास होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत ” प्रतिभा वाचवा देश वाचवा” ह्या चळवळी बद्दल संवाद साधला. ही संघटनां  कुठल्याही जातीय आधारित आरक्षणा विरुद्ध नसून, संविधानाने दिलेल्या खुल्या प्रवर्गातील समाजाचे अधिकाराचे 50% आरक्षण 22% पर्यंतकमी झाल्यामुळे अनारक्षित समाजातले लोकं चिंतीत आहोत हे समजावून सांगितले. त्यावर खुल्या प्रवर्गातील जातींच्या प्रतिभावान मुलांवर होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रसंगी आमदार संजय सावकारे होते. त्यांनी सुद्धा  विषय  मांडायला मदत केली. तसेच सर्व प्रतिनिधीची  ओळख मुख्यमंत्री यांचे सोबत  करून दिली. तसेच योगेश मांडे यांनीही भेट घडवून आणण्यासाठी खूप  सहकार्य केले. या भेटी प्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.