प्रचारक, मतदाता असतील तर राजकारणात यायला आवडेल

0

पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम, कायद्यात बदल होण्याची गरज
जळगांव –

पिडीत युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तोच जबाब ग्राह्य धरून आरोपीची सुनावणी न्यायाधीशांसमोर मांडून आरोपीला शिक्षा देणे उचित ठरेल, फिर्यादी अत्याचार पिडीतेस केवळ व्हिडीओ कॉन्फ रन्सव्दारे साक्ष मांडावी. तिच्या फिर्यादीनंतर मॅजिस्ट्रेट समोर का जबाब घ्यावा, तसेच न्यायालयात खटल्या दरम्यान तिच्यावरील शाब्दिक बलात्कार होणे टाळले पाहिजे जेणे करून फिर्यादीवर दबाव येणार नााही व आरोपीला शिक्षा सूनावणे योग्य होईल, त्या अनुषंगाने कायद्यात सुधारणा होण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत पद्मश्री अ‍ॅड उज्ज्वल निकम यांनी लोकलाईव्हच्या दिलखुलास मुलाखतीत बोलतांना व्यक्त केले. आपण सरकार पक्षातर्फे कायदयाची बाजु मांडून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यानुसार सर्वसामान्यांसाठी आपण राजकारणात येणार का यावर आपल्यासारखे प्रचारक आणि मतदाता असतील तर मला राजकारणात यायला आवडेल असेही त्यांनी सांगीतले.
संपूर्ण महाराष्ट्रास परीचित असलेले अनेक खटल्यात पिडीताला योग्य न्याय मिळवून दिलासा दिला आहे , जसे खैरलांजी, कोपर्डी, मुबई बॉम्बस्फोट खटला आदी प्रकरणात सरकार पक्षाची भुमिका मांडणारे अ‍ॅड. निकम यांनी सरकार पक्षातर्फे काम करतांना पोलीस कर्मचारी, अधिकारी, साक्षीदार हा महत्वाचा घटक असून आरोपींच्या उलट तपासणीसारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. साक्षीदाराला खंबीर होण्यासाठी प्रति उज्ज्वल निकम म्हणून तयारी करून घ्यावी लागते तरच आरोपी कडून साक्षीमधे उत्तर घेतले जाते, पोलीस अधिकारी कर्मचार्‍याची साक्षीदारची तपासणी सरकारी वकील करीत असतो त्यास इन्ट्रोडक्शन व्दारे साक्षीदार हा नैसर्गीक , खोटा कि पोलीसांनी उभा केलेला आहे, हे सिद्ध करावे लागते व याव्दारे त्याचा गुन्हा शाबीत होउन त्याच्या शिक्षेची मागणी करणे योग्य ठरते अन्यथा आरोपीच्या वकिलाकडून याचे भांडवल केले जाते.
2003 च्या एका खटल्या संदर्भात केस घेण्यासाठी अनेक ठिकाणाहुन दबाव येत होता त्या केस मधे पिडीतेने पती परदेशात असल्यामुळे दिड ते दोन वर्षे घटना दडवून ठेवली त्यानंतर खटला दाखल केल्यानंतर पुरावे वा सक्षम माहिती उपलब्ध होणे शक्य नसल्याने काहीही सिद्ध करता आले नसते त्यामुंळे खटला घेण्यास नकार दिला होता तरी देखिल ती केस टिकु शकली नाही. असा देखिल दबाव आला होता असे सांगीतले.
कोपर्डी प्रकरणाने महाराष्ट्राची मान खाली गेली
कोपर्डी प्रकरणी केस खालच्या कोर्टात चालली या दरम्यान विशेषतः प्रसार माध्यमांनी बुद्धी भेद करू नये अशा वेळी अंजन घातले पाहीजे. मोर्चे, आंदोलन यांचा कोणताही परीणाम खटला सुंरू असताना झाला नाही वा दबाव देखिल नाही, माझी भुमिका स्थितप्रज्ञाप्रमाणे सरकार पक्षाचीच भुमिका मांडली. यश मिळाले निरपेक्ष स्थितप्रज्ञ भुमिकेमुळेच असे देखिल सांगीतले. संजय दत्त सारख्या प्रकरणात देखिल मासा जाळयात अडकला आहे तो बाहेर पडण्याची धडपड करणारच आपण केवळ जाळे तुटणार नाही याची काळजी योग्य रित्या घेतली तर कोपर्डी, खैरलांजी प्रकरणात दोषी व्यक्तींना शिक्षा देखिल झाली याचा दाखला दिला.
पोलीसांचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही
कोपर्डी येथील शाळकरी मुलीने चांगले कपडे घातले, हा तीचा गुंन्हा होता का,तीच्यावर अत्याचार झाला हि घटना उघडकीस आली यात क्रौर्याची परीसिमा होती. क्रौर्याला जात,धर्म,पंथ नसतो ती एक विकृती असते. अशा वेळी पोलीस सहकार्य मिळणे अपेक्षित असते ते मिळत नाही.आरोपी कोणत्याही धर्माचा असो समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होउ नये याची काळजी घेतली पाहीजे. फाशीच्या वा अन्य शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी न्यायालय, उच्च न्यायालय, सुप्रिम हा प्रवास कमी झाला पाहीजें.
28 वर्ष सरकारी वकीली करत असतांना आहार विहार नियंत्रणावर लक्ष दिले आहे. धावपळ, कामाची दगदग, ताणतणाव याचा आरोग्यावर परीणाम होतो. ते होउ नये म्हणून वेळेचे बंधन, सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी व रात्री वेळेवर जेवण घेणे गरजे नुसार घेतो.
कसाबने बिर्याणी मागीतली
कसाबचा खटला सुरू असतांना कसाबने आपल्या खाण्यात विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप केला. पुरावा म्हणून पांढरी पावडर असलेली कागदाची पुडी दिली. त्यातील पदार्थाची रासायनिक प्रयोगशाळेत तपासणी केली असता ती तांदळाची पावडर असल्याचे निषन्न झाले. खटल्या दरम्यान हातावर राखी बांधलेली होती ती राखी पाहून हे काय आहे हे कसाबने विचारले असता तुझ्या हातावर देखिल नखवी साहेबांनी बांधलेली होती असे सांगीतले त्यावेळी नाटकीपणे रडल्यासाखे केल्याने डोळे पाणावल्याचे दाखवून बोलण्यास सुरूवात केली त्याच वेळी न्यज चॅनलवाल्यांनी बे्रकिंग न्यूज द्यायला सुरूवात केली हा चमत्कार कसा, इमोशनल वातवरणावर प्रतिप्रशन भरपूर होते, बाहेर आल्यावर कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली होती असे सांगीतल्याने राजकीय नेत्यांनी देखिल यावर राजकारण केले याचा किस्सा सांगीतला.
शिक्षणाने आपण सुसंस्कृत होतो
वेशभुषा, कपडे कोणते परीधान करावेत, फिरण्याचे भान ठेवून फेंडशिप डे हि आपली संस्कृती नाही, ती परकीय संस्कृती असून अनुकरण करणे टाळावे, भडक कपड्यांमुळे अतिप्रसंग ओढवणार नाही याची काळजी घेत कुणाचेही अंकित होउ नये. तसेच आजची पिढी वाईट विचारांनी भरकटू नये, मुलांना मित्र असु शकतात, मित्राप्रमाणेच पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहीजे, त्याला मित्र समजा, तुमची इच्छा लादू नका चुका होउ न देता पुढे जाण्याचे ध्येय प्रत्येक युवकाने गाठले पाहीजे असे आजच्या पालकांना व मुलांना संदेश देतांना मत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.