पोलीस व्हॅन-दुचाकीची महामार्गावर धडक

0

जळगाव-नशिराबाद रस्त्यावरील घटना : दुचाकीस्वार तरूण, महिला ठार, 3 पोलीस, दोन कैदी जखमी

जळगाव, दि.7 –

भुसावळ न्यायालयाच्या कामकाज संपल्यानंतर सात कैद्यांना जळगावातील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी आलेल्या पोलीस वाहनाची समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव भुसावळ रस्त्यावरील दुरदर्शन टॉवरजवळी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून उपचार सुरू असताना महिलेचा देखील मृत्यू झाला. दरम्यान, पोलीस वाहनातील तीन पोलीस कर्मचारी आणि सात कैद्यांपैकी दोन कैदी जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ न्यायालयात सात कैद्यांबाबतची सुनावणी असल्याने सात कैद्यांना जळगाव जिल्हा कारागृहातून भुसावळला पोलीस वाहन टाटा टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक (एमएच 19 एम 0713) ने दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर पुन्हा त्याच पोलीस गाडीने जळगावकडे येत होते.
ओव्हरटेक करताना अपघात
खेडीजवळील दुरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी क्रमांक (एमएच 19 सीसी 8833) दुचाकी ओव्हर टेक करत असल्याचे पाहून पोलीस वाहनावरील चालकाने वाहनवर ताबा घेत दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना जोरदार धडक दिली.
पोलीस कर्मचारी, कैदी जखमी
पोलीसाची वाहनाने दोन कोलांट्या घेतल्याने मध्ये बसलेल्या पोलीस कर्मचारी प्रकाश विश्राम काळे (वय-56), गयासेद्दिन कमोद्दिन शेख (वय-57) आणि दिलीप प्रकाश केंद्रे (वय-29) सर्व रा. पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस लाईन तर कैद्यांमध्ये भागवत दामू सुर्यवंशी (वय- 34) रा.साकळी ता.यावल आणि सुरेश पंडीत बोदडे (वय-34) रा.विवरा ता.रावेर असे एकुण पाच जण जखमी झाले. दरम्यान, यांच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी गजानन दत्तू जाधव (वय-26), आकाश अरूण मोहने (वय-22), आकाश रायचंद गोसावी आणि चालक अनिल तायडे यांच्यासह कैदी शेख कलीम शेख सलीम (वय-27) रा. भुसावळ, चंद्रभान श्यामराव सोनवणे (वय-20) रा. जळगाव, सदाशिव पांढरीनाथ पवार (वय-21) रा. बोदवड, आनंद मधू वानखेडे (वय-23) रा.चिंचोडे ता.यावल आणि शेख अशरु शेख चांद (वय-30) बोदवड हे किरकोळ जखमी झाले आहे.

दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू
धडकेत दुचाकीवरील उमेश संजय वारूळे (वय-22) रा.24, शनिपेठ हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेल्या जया प्रभाकर गायकवाड (वय-26) रा. हिवरखेडा ता.जामनेर ह्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा देखील मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.