पोलीस पाटील यांची हंस चित्रपटगृहात बैठक संपन्न

0

चाळीसगाव :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठक 17 चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील हंस चित्रपट गृहात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस तहसिलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, नायब तहसीलदार (महसूल) रणजित पाटील, पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.

सदर बैठकीत सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद पवार यांनी सर्व पोलीस पाटील यांनी गावात कायदा व सुव्यस्था आबादीत राखण्यासाठी आवश्यक ते कार्य पार पाडावे. आपल्या गावात व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जन जागृती करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती कामे करावीत, निवडणूक काळात त्यांची भूमिका काय असेल याबाबत पाटील पाटील यांना सूचना दिल्या.

तसेच सर्व पोलीस पाटील यांना इव्हीएम यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हीव्हीपॅट यंत्र इव्हीएम यंत्राला कसे जोडावे, यंत्रात कोणती इरर आल्यास काय करावे, यंत्र सुस्थितीत राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.