पेट्रोल डिझेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्या !

0

अमळनेर (प्रतिनिधी) :-देशात कोरोनाच्या संकटात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्याचा महागाई वर परिणाम होतांना दिसून येतोय.यासंदर्भात अमळनेर काँग्रेस तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, कोरोनाच्या संकटात लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले असुन, महागाई दिवसेंदिवस दिवस वाढतच आहे. उद्योग धंदे देखील मोठ्या प्रमाणात बंद आहेत,अशातच पेट्रोल व डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. ७ जुन पासुन ते आजपावेतो इंधनाचे दर वाढतच आहेत. देशभरातील पेट्रोलच्या किंमती ८७-८८ रू. च्या पुढे गेल्या आहेत
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी असुन देखील सामान्य जनतेला दिलासा दिला जात नाही. सर्वसामान्य जनता दुहेरी संकट असतांना याप्रश्नी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी विनंती निवेदनात केलेली आहे. निवेदन नायब तहसीलदार पवार यांना देण्यात आलेले आहे.

निवेदन देतांना सुलोचना वाघ जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष, गोकुळ नामदेव बोरसे तालुका अध्यक्ष, मनोज पाटील शहराध्यक्ष, मुन्ना शर्मा, सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.