पुलवामा चकमकीत तीन दहशतद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद

0

जम्मू-काश्मीर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (16 मे) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात जवानांना यश आलं आहे. तर एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पुलवामामधील दलीपोरा येथे भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर आज पहाटे जवानांनी या भागाला घेरले. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी तीनन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शोपियानमधील चकमकीनंतर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा ही काही काळासाठी बंद करण्यात आली होती. पुलवामा सेक्टरमध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jammu & Kashmir: An exchange of fire between terrorists and security forces began in Dalipora area of Pulwama earlier this morning. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/BW3aFWelN2

— ANI (@ANI) May 16, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.