पुलवामा चकमकीत ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर :- जम्मू-काश्मीरच्या पुलवामात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवानांनी ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून शौकत अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. शौकत हा चार वर्षांपूर्वी दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गेले अनेक दिवसांपासून भारतीय सुरक्षादल आणि दहशवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. पुलवामा येथील अवंतीपोरा येथील पंझगाम येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार शुक्रवारी रात्रीपासून सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली होती. या दरम्यान शनिवारी पहाटे सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना घेरले असून, त्यांच्या या चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दरम्यान सुरक्षादल आणि दहशवादी यांच्या मध्ये जोरदार गोळीबार सुरु आहे. याठिकाणी सुरक्षदल्याच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. त्यामुळे येथील वातावरण अतिशय तणावाचे असून, स्थानिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सुरक्षादलच्या अधिकाऱ्यांनी स्थनिकांना सध्या घरातच थांबण्याचे आव्हान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.