पीएफ खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

पीएफ खात्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने नवी घोषणा केली आहे. या नविन नियमावलीनुसार पीएफ खात्याची विभागणी ही दोन भागात होणार आहे. पीएफ खात्यातील व्याजावर आता कर आकारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या असलेली भविष्य निर्वाह निधी खाती ही आता नव्या स्वरूपात असणार आहेत.

पीएफ खात्यातील व्याज मोजण्यासाठी त्यातच एक स्वतंत्र खाते उघडण्यात येईल. या खात्यावरून व्याजाच्या रक्कमेवर व्यवहार केला जाईल. या दोन स्वतंत्र खात्यांना कर्मचारी भविष्य निधी करपात्र खाते आणि कर नसलेल्या खात्यांमध्ये विभागले जाणार आहे. ही कार्यप्रणाली योग्य चालवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची असणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सुचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंतच्या व्यवहारावर कसलाही कर लावला जाणार नाही. या नियमावलीची अंमलबजावणी ही आर्थिक वर्ष 2021-22 पासून सुरू करण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षानंतर कायम ही नियमवली लागू असेल. यामध्ये काही नियम आणि अटींचा समावेश आहे. त्यानुसार ही कार्यप्रणाली काम करणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे.

दरम्यान, या नियमावलीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. नविन नियमावली 2022 पासून लागू होणार आहे. पण या नियमावलीत आर्थिक वर्ष 2021-22 साठी पण काही तरतुदी आहेत. ज्या खात्यावर 2.5 लाख ऐवढी वार्षिक ठेव आहे, त्या खात्यांना हा नियम 2021 पासूनचं लागू असेल, असंही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.