पिलखोड येथील लाचखोर तलाठी अटकेत

0

चाळीसगाव : शेतीचा उतारा देण्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतीरीक्त २४० रुपयांची लाच स्वीकारणार्‍या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तलाठी प्रशांत ज्ञानोबा कनकुरे (32,रा.चाळीसगाव, जि.जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पिलखोड येथील तलाठी प्रशांत ज्ञानोबा कनकुरे (वय-३२) रा.चाळीसगाव याने आज दुपारच्या वेळेस शेतीच्या उतारा देण्याच्या कामी शासकीय फीच्या व्यक्तीरीक्त २४० रूपयांची अतिरिक्त पैसे (लाच) मागितले. एसीबीचे अधिक्षक गोपाळ ठाकूर, पो.नि.निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांना सपळा रचून तलाठी कनकुरे यास ताब्यात घेतले. पुढील तपास पो.नि. निलेश लोधी करीत आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.