पिकअपची मोटारसायकलला धडक ; एकाच मृत्यू

0

पहूर  : पिक अप व मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी पहूर-शेंदूर्णी मार्गावरील घोडेस्वारबाबा दरगाहजवळ घडली.  अनिल चत्तरसिंग गजरे(भोई) (वय ४५, रा. महादेव बांबरुड, ता. पाचोरा) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल गजरे(भोई)  हे पहूरजवळील शेरी धरणातील मासे आपल्या गावी घेऊन जात असतांना घोडेस्वारबाबा दरगाहजवळ वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या पिकअप बोलेरो गाडीने (एमएच. ४३ ऐडी ८२५५) त्यांच्या मोटारसायकलला(एम.एच. १९ ए. एम. २४५६) जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण बर्गे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल राठोड, ईश्वर देशमुख यांनी घटनास्थळी येऊन मयतास पहूर ग्रामीण रूग्णालयात हलविले. मयत अनील गजरे यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, असा परिवार आहे. पहूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.