पिंपळकोठा सरपंचपदी नंदादीप बडगुजर

0

एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळकोठा बु. येथे अभ्यासी अधिकारी एन.आर.महाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन सरपंच पदासाठी निवड करण्यात आली. नंदादीप किशोर बडगुजर यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र असल्याने त्यांची सरपंच म्हणुन बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

याप्रसंगी उपसरपंच प्रकाश पाटील,बेबाबाई बडगुजर,सुकमाबाई भिल,ज्ञानेश्वर बडगुजर,दत्तु बडगुजर,साहेबराव पाटील,शमीम बी सैयद, खैरुनिसा मण्यार इत्यादी सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी आर.के.पटाईत, अशोक बडगुजर, किशोर बडगुजर, बाबुराव बडगुजर,राजू बडगुजर, बापू पाटील, खंडू हटकर, गुलाब बडगुजर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.