पाेलिसांनी काठीचा ‘प्रसाद’ देऊन तरुणांची हळदी-कुंकु लावून केली पूजा

0

जळगाव | प्रतिनिधी 

संचारबंदीत रस्त्यावर फिरु नका, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करु नका अशा सूचना देऊन देखील बेजबाबदार नागरिक संचारबंदी झुगारुन बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत अाहे. पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून रस्ते बंद केली तरी देखील आड मार्गावरुन शहरात येणाऱ्यावर बुधवारी पाेलिसांनी काठी उगारून त्यांना ‘प्रसाद’ दिला. तसेच इच्छादेवी चाैकात तरुणांची हळदी-कुंकु लावून पूजा केली. दरम्यान, स्थानिक पाेलिसाच्या मदतीला सीआरपीएफची एक तुकडी दाखल झाली अाहे.
मंगळवारी रात्री लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर हजारो नागरिक किराणा, भाजीपाला, औषधी घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे बुधवारी रस्त्यावर गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा होती; परंतु अनेकांनी पुन्हा-पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या बेपर्वाईचे दर्शन घडवले. लॉकडाऊनमुळे संपूर्ण शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. चौकाचौकात पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. पोलिसांना पाहून रस्ते बदलून लोक आडमार्गाने फिरत आहेत. मुख्य चौकात पोलिसांनी अडवल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडल्याचे कारण नागरिक सांगत आहेत. काहीजण विनाकारणही बाहेर निघत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.