पावसाने पिकांचे नुकसान; पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या; नगराध्यक्ष निलेश चौधरी

0

तहसीलदार यांना निवेदन

धरणगाव:-तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस ची बॅटींग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या घासपावसामुळे हिरावला आहे. तसेच सततच्या पावसामुळे अनेक घराचं देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावी अशी मागणी धरणगाव शहर शिवसेना तर्फे तहसीलदार नितीन देवरे यांना मागणी चे निवेदन सादर करण्यात आले
धरणगाव तालुक्या सह इतर खेड्यात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्या सह मुसळधार पावसामुळे कापूस, केळी, उडीद, मूग, लिबु, तसेच सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेतसेच शहरी भागातील व ग्रामीण भागातील घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. आगोदर शेतकरी पूर्णपणेआर्थिक संकटानी होरपळलेल्या असून त्यात हे संकट खूप मोठे आहे म्हणून बळीराजा ला या संकटांतून सावरण्यासाठी नुकसान भरपाईद्यावी, तसेचबहुतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून पीक विम्या ची रक्कम मिळण्यासाठी पंचनामा ची गरज आहे असे निवेदनात म्हटले आहे तसेच पंचनामे झाल्यावर त्वरीत रक्कम मिळविण्यासाठी राज्यांचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे ,कृषी मंत्री दादा भुसे, जळगांव पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा कडे नुकसान भरपाई मागणीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा मार्गदर्शन खाली दिले असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी म्हटले.

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर नगरसेवक वासुदेव चौधरी , विलास महाजन, भागवंत चौधरी, विजय महाजन, अहेमद पठाण बापू पारेराव, सुरेश महाजन नंदू पाटील, धिरेंद्र पुरभे, कमलेश बोरसे, रवींद्र जाधव , वाल्मिक पाटील, दीपक चौधरी, नितीन चौधरी, राहुल महाजन, ओंकार मिसर, सागर गुरव , विनोद रोकडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.