केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी विरूद्ध भडगावात शिवसेनेचा मोर्चा

0

भडगांव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने केलेल्या  कांदा निर्यात बंदी विरुध्द तसेच संसदेत शेतकरी संदर्भात नुकतेच पास केलेले बिल आणि भडगांव तालुका ओला दुष्काळी तालुका म्हणून  जाहिर व्हावा अशा विविध मागण्यांकरिता भडगांव तालुका शिवसेना, युवासेना,आणि महिला आघाडीच्या वतिने तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले या वेळी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.

या बाबत आधिक माहिती अशी की,लॉककडाउन च्या काळा हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवास कांद्याला थोडा भाववाढ मिळून दोन पैसे त्याच्या पदरात पडतील अशी आशा वाटू लागली परंतु अशातच केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केली आणि कांद्याचा भाव गडगडला आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला.त्या निषेधार्थ त्याच प्रमाणे केंद्र शासनाने तडका फडकी शेतकऱ्यां संदर्भात अद्यादेश काढून एक विधेयक पास केले ते शेतकरी हिताचे नसून ते शेतकऱ्यांच्या मानगूटीवर जबरदस्तीने बसवून देशातील शेतकरी वर्गाला असंख्य समस्येचे खाईत लोटणारे विधेयकहि रद्द करावे.गेल्या पंधरा दिवसापासून बेफाम आवकाळी पाऊस बरसत आहे.त्या मुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात येणारी तयार पिके ऐन उत्पन्न घरात येण्याची वेळ असतांना या वादळ आणि पाऊसा मुळे भुईसपाट झाली आहेत..फळ बागा केळी,निंबू,मोसंबी ,पेरु ,तसेच कापूस ,ज्वारी ,बाजरी,सोयाबिन ,मुग ,उडीद आदि पिकांची प्रचंड हानी झाल्याने शेतकरी हैरान झाला आहे.म्हणून भडगांव तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर व्हावा अशा आशयाचे मागण्यांचे निवेदन भडगांवचे नायब तहसीलदार भालेराव यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा ताई पाटील,उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी,तालुका प्रमुख डाॕ.विलास पाटील,विधानसभा क्षेञ प्रमुख जे.के.पाटील,शहर प्रमुख योगेश गंजे,शेतकरी सेनेचे ता.प्र.अनिल पाटील,महिला ता.प्र.सीमाताई पाटील,पुष्पाताई,ईम्रान अली सैय्यद, परदेशी ,सौ.वाघ,युवासेनेचे लखिचंद पाटील,रविंद्रपाटील,निलेश पाटील,जि.प.मा.सभापती विकास पाटील,भुरा अप्पा,दिपक पाटील कोठली,शशीकांत येवले,सुनिल देशमुख,जगन भोई,संतोष महाजन,बापुराव चिंधा पाटील ,सतिष पाटील गुढे, शंकर मारवाडी,मनोहर चौधरी,राजेंद्र आचारी,हाशीमभाई मिर्झा,विशाल(पप्पू)पाटील,आबा चौधरी,भैय्या राजपूत,आदि शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.