पाळधीच्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

0

जामनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील पाळधी येथील एका ७० वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पाळधीसह परिसरात आज खळबळ उडाली. जामनेर तालुक्यात सुद्धा हळूहळू कोरोना प्रवेश करीत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीच पळसखेडा बु येथे पहिला रुग्ण आढळला होता.
पाळधी येथे बाहेरगावहुन आलेल्याचे जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले जात होते याठिकाणी २२ते२३ व्यक्तींना क्वारंटाईन केले होते .त्यामध्ये नांद्रा(प्र लो) ता जामनेर येथील एकाच परिवारातील आठ व्यक्तीचा समावेश होता. हे कुटुंब घाटकोपर (मुंबई)येथे बऱ्याच वर्षांपासून नोकरी निमित्त स्थायिक झालेले होते. मूळ गाव नांद्रा ता जामनेर येथे कोणी जवळचे नसल्याने ते पाळधी येथे नातेवाईकांकडे आले .त्यांना येथील जि प शाळेत १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यापैकी एका ७० वर्षीय व्यक्तीची तब्बेत बरी नसल्याने मागील आठवड्यात त्यास पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे देखील फरक न पडल्याने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते .तपासणीत आज सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पाळधीसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने ३दिवसाचा कळकळीत बंद करण्यात आल्याचे सांगितले
जामनेर येथील गटविकास अधिकारी डी एस लोखंडे यांनी देखील भेट देऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
तत्पूर्वी रुग्णाच्या परिवारातील ७ व त्यांच्या नातेवाईकाच्या परिवारातील ४ व्यक्तींना रक्ताचे नमुने घेण्यासाठी पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
वाकोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ संदीप पाटील, डॉ जितेंद्र जाधव,डॉ स्वाती पाटील, ज्योती भंगाळे,राजू मोरे,लता सुशिर,सुरडकर व आशा वर्कर याच्या पथकाने भेट देऊन तपासणी केली यावेळी सरपंच सोपान सोनवणे, उपसरपंच संदीप सुशीर, माजी सरपंच कमलाकर पाटील, रतन पाटील, प्रविण पाटील, योगेश पाटील, संजय शेळके आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.