पारोळा येथे गुटख्यासह प्लास्टिक जप्त

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा शहरातील आझाद चौक परिसरातून एका किराणा दुकानतुन तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सुमारे चार हजार रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ गुटखा व प्लास्टिक कॅरिबग जप्त करण्यात आले आहेत.
सध्या संपूर्ण जगात कोरोना वायरस ने धुमाकूळ घालत असताना तसेच सर्वत्र जिवनाअवश्यक सेवा वगळून बाकी सर्व म्हणजे पानटपर्या तसेच इतर तंबाकुजन्य पदार्थान वर बंदी घालण्यात आली आहे, त्यातच किराणा दुकानाना जिवनाअवश्यक वस्तूची सेवा म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहेत, याचाच फायदा घेत पारोळा येथिल अाझाद चौकाततील जगन्नाथ वाणी यांच्या किराणा दुकानात खाद्य पदार्थ व्यक्ति रिक्त तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आले म्हणून त्याच्या दुकानात जाऊन तंबाखूजन्य गुटखा व त्यांच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या ही आढळून आल्या त्या देखील या वेळेस जप्त करण्यात आल्या, सुमारे चार हजार रूपये किमतीचा माल पारोळा येथिल तहसीलदार अनिल गवांदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ, विजय कुमार मुंडे, तसेच शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लांजेवार व पारोळा नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी जप्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.