पारोळा कुटीर रूगणालयात लोकसहभातुन यंत्रसामग्री खरेदी !

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे आज कुटीर रूग्णालयात व कोव्हीड सेंटर ला लागणार्या यंत्र सामग्री घेण्यासाठी प्रांत विनय गोसावी यांनी आमदार,नगराध्यक्ष नगरसेवक, लोकप्रतिनिधी,डाॅक्टर असोशिएशन,व्यापारी महासंघ,सामाजिक संस्था यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रांत विनय गोसावी यांनी माहिती देत सांगीतले की, येणार्या काळात कोरोना पेंशट वाढण्याची शक्यता लक्षात घेता आपल्याला तैयारी करण्याची गरज असुन या साठी आपल्या सर्वावांची गरज असुन आपल्या सहभागातुन काही यंत्र सामग्री घेण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर पारोळा एरंडोल चे आमदार मा,चिमणराव पाटील यांनी दोन्ही तालुक्यात कायम स्वरूपी २० २० आॅक्सिजन बेड पाईप लाईनसह दोन्ही पारोळा व एरंडोल तालुक्यात २७५०००, दोन लाख पंच्चात्तर हजार रूपये २७५०००,असे ५५००००, पाच लाख पन्नस हजार चा आमदार निधी दिल्याचे सांगीतले ,तर कोरोना शी लढा देण्यासाठी अजुन ही काही मदत लागल्यास ती देण्याचे आश्वासन दिले आहे.

तर स्वता प्रांत यांनी १० हजार रूपये रोख देऊन या कार्याची सुरूवात केली तर पारोळा तहसिलदार अनिल गंवादे यानीही १० हजार रूपये दिले,तलाठी संघटनेच्या वतीने २२०००रू रोख, उंदिरखेडा येथिल उपसरपंच गणेश पाटील यांनी ११००० रू रोख दिले. तर पारोळा नगर पालिकेच्या वतीने पारोळा नगराध्यक्ष करण पवार, मुख्यअधिकारी यांनी पारोळा नगर पालिकेच्या वतीने ३०००००,तीन लाख रूपये मदत म्हणुन देणार असल्याचे सांगीतले तर पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने एक एक्सरे मशीन व लहान मुलासांठी लागणारे मेडीकल रेडीएंट वार्मर, तसेच शुध्द पाण्यासाठी एक्वागार्ड देण्याचे जाहीर केले तर पारोळा पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरिक्षक निलेश गायकवाड यांनी ही व्यक्तीक मदत म्हणुन ५ हजार रूपये रोख दिले तर पारोळा मेडीकल असोशिएशन कडुन ई,सी,जी मशीन देण्याचे जाहीर केले. तर प्रांत अधिकार्या कडुन रूग्णालया साठी जनरेट ची खरेदी करण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.

या सर्व यंत्र सामग्री सह इतर काही येणार्या सर्व यंत्र सामग्री चे लवकरच लोकार्पण करण्यात येणारअसुन कुटीर रूग्णालयात या सर्व यंत्रसामग्री अभावी व सुविधांअभावी उपचारासाठी रूग्णाना जळगांव,धुळे,येथे उपचारासाठी जावे लागत होते या सर्व यंत्रसामग्री ने आता इथेच इलाज करने शक्य होणार असल्याचे प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी सांगितले या बैठकीला पारोळा तहसिलदार अनिल गंवादे,पारोळा नगर पालिकेचे मुख्यअधिकारी डाॅ,विजय मुंडे, तालुका वैधकिय अधिकारी प्रांजली पाटील,पारोळा वैधकिय अधिकारी योगेश सांळुखे, गटविकास अधिकारी मंजुश्री पाटील, जि,प,सदस्य हिम्मत पाटील, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रा,आर,बी,पाटील, आमदार चिमणराव पाटील यांचे स्विय्य सहय्यक राजु कासार, नगरसेवक पी,जी,पाटील,तलाठी निशिकांत पाटील, व्यापारी महासंघाचे विलास वाणी,उमेश जैन, केशव क्षत्रीय,महेश हिंदुजा, रमेश कुमार जैन, संजय कासार,धर्मेंद्र हिंदुजा, अशोक कुमार लालवानी,सामाजीक कार्यकर्ते ,नगरसेवक, पत्रकार,तसेच अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

५० लाखाचा निधी राखीव-आ चिमणराव पाटील
या वेळी पारोळा एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांनी कोरोना काळासाठी व अत्यावश्य सेवेसाठी ५० लाखाचा निधी राखुन ठेवल्याचे भ्रमणध्वनी द्वारा सांगीतले तर उपस्थित सर्वाना जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.