पाझर तलावातून मुरूम वाहतुकीची रॉयल्टी करण्याचे आदेश

0

जळगाव – भुसावळ येथील जिल्हा परिषदेचे मालकीचा पाझर तलाव १ मधून राष्ट्रीय महामार्ग क्र ६ च्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुमाचे उत्खनन केलेल्या मुरुमाचे २५ टक्के रॉयल्टीची रक्कम जि.प फंडामध्ये विकास कामासाठी भरणे बाबत सूचना करून ही संबंधित ठेकेदाराने ती न भरल्याने जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना तसं पत्र दि ३१ डिसेंबर रोजी दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भुसावळ येथील जि.प  मालकीचा पाझर तलाव क्र १च्या बुडीत क्षेत्रा मधून अनुक्रमे वीस हजार व चोवीस हजार पाचशे ब्रास मिळून ४४५०० ब्रासच गौणखजिन उचलण्याची परवानगी दिली होती मात्र संबंधित ठेकेदाराने ४४२८९ ब्रास स्वतःचा कामासाठी  वापरल्याने त्याचेकडून २५ टक्के रॉयल्टी म्हणजेच ४८. ७२ लाख वसूल होणे आवश्यक आहे अशी सूचना दिल्याने संबंधित ठेकेदाराने जि.प सेस फंडामध्ये भरण्याची हमी दिली होती. त्यानुसार तसे सूचना जिल्हा जलसंधारण अधिकारी

व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत देण्यात यावा असे पत्र गुरुवारी जि.प सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.