पाच वर्षात शिवाजी महाराजांचे स्मारक ज्यांनी उभे केले नाही ते महाराष्ट्र काय उभा करणार !

0

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा सवाल

एरंडोल : अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्या संदर्भात ज्यांनी खुप गाजावाजा केला त्यांनी पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे केले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील आम जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे व त्यांना या निवडणुकीत जनता जनार्दन आडवे केल्या शिवाय राहणार नाही अशी जळजळीत टीकेची झोड एरंडोल येथे गुरुवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात एरंडोल विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.सतीष पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा पार पडली.त्याप्रसंगी ते बोलत होते.डॉ.अमोल कोल्हे यांनी आपल्या विस मिनिटांच्या अभिनय शैलीत भाषण करत शिवसेना व भाजप युती सरकारचा खरपूस समाचार घेतला.याप्रसंगी डॉ.कोल्हे यांच्या भाषणास सुरुवात होताच उपस्थितांनी त्यांच्या आवाज ऐकताच टाळ्या वाजवल्या.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीष पाटील,advt.रविंद्र पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार,अमित पाटील,रोहन पाटील,सुदाम पाटील,तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,डॉ.राजेंद्र देसले,विकास पवार,राजेंद्र शिंदे,आकाश पाटील,advt.विश्वासराव भोसले,तसेच कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,सुकलाल महाजन,डॉ.के.ए.बोहरी,बाळासाहेब पाटील,डॉ.फरहाज बोहरी,संजय भदाणे,इमरान सैयद आदि मान्यवर नगरसेवक,नगरसेविका व नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलतांना महाराष्ट्राची गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय ३ सप्टेंबरच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यासंदर्भात चर्चा होत असतांना सत्तेत असलेला शिवसेनेचा ढाण्यावाघ नंदी बैलासारखा मान डोलवत होता तसेच इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातुन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्यात आला.त्याला जबाबदार असलेल्या शिवसेना व भाजपला महाराष्ट्र हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही अशी जळजळीत टीका डॉ.अमोल कोल्हे यांनी केली.याच बरोबर पाच वर्षात महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने भुकेला राहिला.१ लाख ४२ हजार उद्योग बंद पडल्या,१६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या,शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना वाढल्या व बेरोजगारी सुद्धा आ वासून उभी राहिली.महाराष्ट्र हि संतांची व थोर पुरुषांची भूमी असल्याने त्यांनी हात पसरायला सांगितले नाही तर हातांना रोजगार दिला पाहिजे.महाराष्ट्राला भिक लागली नाही.पाच वर्षात सत्तेवर असतांना १० रुपयांची थाळी आली नाही आणि आता मतांचा जोगवा मागण्यासाठी १० रुपये थाळीचे प्रलोभन दाखविले जात असल्याचे प्रतिपादन डॉ.कोल्हे यांनी केले.जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या सेल्फि बद्दलही टीकास्त्र सोडले.आपल्या दिमाखदार शैलीत डॉ.कोल्हे यांनी ई.डी. व सी.बी.आय.चौकशी संदर्भात हल्ला बोल करून सांगितले की अजगर रुपी युती सरकारने आपल्या धाकात शिवसेनेच्या ढाण्यावाघाला गिळले व शेवटी ई.डी.च्या चौकशीत शरद पवार साहेबांना अडकविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ई.डी.लाच वेडे केले.

प्रास्तविक डॉ.सतीष पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकातून विरोधी उमेदवार चिमणराव पाटील यांचे नाव न घेता चिमणराव व त्यांच्या मुलाने शेतक-यांची पळखाटी खाऊन गेले असल्याचा आरोप त्यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.डी.पाटील यांनी तर आभार ईश्वर बि-हाडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.