पाचोऱ्यात २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा

0

पाचोरा –  पाचोरा – भडगांव ग्राहक सेवा संघ या सेवाभावी ग्राहकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे “२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन” येथील अहिर सुवर्णकार मंडळात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिला पाटील तर प्रथम उपस्थितांमध्ये संघाचे उपाध्यक्ष आनंद नवगिरे, विनोदराय मोदी, सरचिटणीस प्राचार्य डी. एफ. पाटील, अर्चना पाटील, प्रा. एल. बी. शर्मा, आर. पी. बागुल सह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन शिला पाटील यांनी ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य तसेच मालाची गॅरंटी, वारंटी याबाबत सविस्तर माहिती दिली. संघाच्या कार्यकारिणी सदस्या

डॉ. अर्चना पाटील यांनी २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” व १५ मार्च “जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवुन देवुन डॉ. विलासराव देशमुख यांनी ग्राहक जागृतीसाठी व ग्राहक प्रबोधनासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे सांगुन शेतकऱ्यांनी बियाणे घेतांना पावती घेणे आवश्यक आहे. व त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. संघाचे उपाध्यक्ष आनंद नवगिरे यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेला “ग्राहक संरक्षण कायदा – २०१९” बाबत सविस्तर माहिती सांगुन “जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच” चे नाव आता “जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग” झाले आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात आता एक कोटी रुपयांचे दावे या ठिकाणी चालतील व १ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंतचे दावे राज्य आयोगात चालतील तर १० कोटी रुपयांपुढील दावे हे राष्ट्रीय आयोगात चालतील. तसेच खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर या कायद्याअंतर्गत कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. असेही यावेळी आनंद नवगिरे यांनी सांगितले. प्राचार्य डी. एफ. पाटील यांनी दिशाभूल करणाऱ्या, खोट्या, फसव्या, अनुचित जाहिरातींना या नविन कायद्यात कडक शिक्षा व दंड ठोठावला जाईल. असे प्रामुख्याने सांगितले.

कार्यक्रमास खलील शेख, दिपक सावा, प्रकाश देशमुख, राजेंद्र पाटील, कैलास अहिरे, लता शर्मा, उज्वला देशमुख, अॅड. मनिषा पवार, कविता महाजन, माया पंजाबी, सुनिता चंद्रात्रे, संगिता नेवे, लिना राजपुत, सविता दायमा, सुमंगला तांबोळी, सुमन पाटील, स्नेहल ब्राम्हणे, आरती पाटील, सुशिल शिंदे, समीर खाटीक, सौदागर जमील, विशाल साठे, महेंद्र खंडेलवाल, राजेश धनराळे, राजेंद्र जगताप, राजु साथी, राजु गायकवाड, युवराज खेडकर, राधेशाम दायमा, रविंद्र नेवे, रविंद्र सोनवणे, राकेश सावंत, कृष्णा पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला महाजन तर आभार अशोक महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.