पाचोऱ्यात १ लाखाचा गुटखा जप्त !

0

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील मानसिंगका बिल्डींग समोरील आरती पानमसाला सेंटर मध्ये १ लाखाचा गुटखा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकाने हस्तगत केला असुन रात्री उशिरापर्यंत आरती पानमसाल सेंटरचे संचालक राजा रत्नाणी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कार्यवाहीमुळे शहरातील इतर अवैध गुटखा करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असुन उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.