पाचोरा रेल्वे स्टेशनला महाप्रबंधकांचा दौरा

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दि.२२ सप्टेंबर रोजी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्टेशनवर भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी मागील काळात पाचोरा स्टेशनवर भारतीय जनता पार्टीने केलेल्या रंग रंगोटी व सौंदर्यीकरणाचे त्यांनी कौतुक करत आभार देखील व्यक्त केले. यावेळी महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांना खालील मागण्यांचे निवेदन दिले.

पाचोरा येथील नागरिक मोठया प्रमाणात जळगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड  येथे नोकरी व व्यवसाय निमित्त अप – डाऊन करत असुन पॅसेंजर गाडी बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.त्यासाठी लवकरात लवकर पेसेंजर – मेमु गाडी सुरू करून त्यांना मासिक पास मिळावा, पाचोरा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.३० वाजेनंतर नाशिक व मुंबई जाण्यासाठी कुठल्याही गाडीला थांबा नसल्याने गाडी क्रं. ०२१०६ विदर्भ एक्सप्रेस व गाडी क्रं.. ०२८१० हावडा-मुंबई मेल ह्या गाड्यांना थांबा मिळावा, तसेच पाचोरा येथून सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे जाण्यासाठी एकही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं. ०६५०१ अहमदाबाद – बेंगलोर (सोलापूर मार्गे) या गाडीला पाचोरा येथे थांबा मिळावा. अशा मागण्यांचे निवेदन भा. ज. पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचेतर्फे अनिलकुमार लाहोटी यांना देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.