पाचोरा नगरपरिषदेची प्‍लॅस्‍टीक बंदीबाबत धडक मोहीम

0

पाचोरा (प्रतिनिधी) :.येथील नगरपरिषदेने आज दि २७ रोजी “प्‍लॅस्‍टीक मुक्‍त पाचोरा शहर अभियानाअंतर्गत” शहरातील विविध प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्‍यात आली.  यावेळी सुमारे १० हजार रुपये दंड जप्‍त करण्‍यात आला.

यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्‍हा पुन्‍हा बंदी असलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्‍द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नागरीकांनी देखील प्‍लॅस्‍टीक पिशव्‍यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे शहरातील सामाजीक संस्‍थांशी संपर्क करुन प्‍लॅस्‍टीक बंदी मोहीमेत उत्‍स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच प्‍लॅस्‍टीक वापराबाबत काही शंका असल्‍यास व्‍यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्‍याचे देखील आवाहन मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी केले.

सदरची मोहीमे वेळी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, ललित सोनार, राजेश कंडारे, अनिल वाघ, किशोर मराठे, अमोल अहिरे, मुकादम बापु ब्राम्‍हणे, राजू लहासे, निळकंठ ब्राम्‍हणे, देविदास देहडे, वाल्मिक गायवाड, सुनील वाकडे, संजय जगताप, आकाश खैरनार, विजय ब्राम्‍हणे, भास्‍कर ब्राम्‍हणे, किरण ब्राम्‍हणे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.