पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेटने गोरविले

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी :  शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले यांच्या शिफारशीनुसार ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिकेने मानद डॉक्टरेट दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. ती लोकडाउन मुळे तो सोहळा होऊ शकला नाही म्हणून नुकतेच बहादपुर ता.पारोळा येथे समाजसेविका निलिमाताई मिश्रा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात पद्मश्री तथा मॅगसेस पुरस्कार विजेत्या समाजसेविका नीलिमाताई मिश्रा यांनी उज्जैनकर  सर यांच्या कार्या विषयी भरभरून कौतुक केले त्या म्हणाल्या की समाजासाठी प्रत्येकाचा देणे लागते उज्जैनकर सर त्यापैकीच एक आहेत एक शिक्षक ज्यांची शिक्षणाची नाळ समाजा सोबत जोडून सामाजिक, साहित्यिक, कला आणि आरोग्य क्षेत्रातील उज्जैनकर यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे सतत कामात व्यस्त असणारा हा माणूस आपली नोकरी सांभाळून समाजाप्रती काही तरी देणे लागतो.

या भावनेने प्रेरित झालेला आहे माझ्याशी त्यांचा नेहमी मोबाईलद्वारे संवाद सुरू असतो त्यांच्या कार्याविषयी मी बऱ्याचदा त्यांच्याकडून जाणून घेत असते आज उज्जैनकर सरांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी द्वारा जाहीर झालेली त्यांच्या 24 वर्षाच्या समाजकार्यातील मानद डॉक्टरेट माझ्या हस्ते प्रदान होत आहे. याचा मला आज सार्थ अभिमान वाटतो सरांचं कार्य अजूनही द्विगुणीत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते असे आपल्या अध्यक्षीय भाषणात निलिमाताई यांनी उज्जैनकर सरांच्या कार्याचे खूप कौतुक केले.प्रसंगी प्रमुख अतिथी केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद दहिवले यांनी सुद्धा आपल्या भाषणात शिवचरण उज्जैनकर सरांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

आणि ते म्हणाले की अगदी कमी कालावधी मध्ये उज्जैनकर सरांनी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, मुंबई विभाग अशा विविध जिल्हा व तालुका शाखा निर्माण करून त्या सक्षम केलेल्या आहेत एक आदर्श शिक्षक, कुशल संघटक, सक्षम समाजसेवक म्हणून उज्जैनकर सरांचं कार्य खूप मोठे असल्याचे डॉ.दहिवले प्रसंगी म्हणाले याप्रसंगी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री  संजू भटकर यांना सुद्धा मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया सर  तालुका उपाध्यक्षा सौ ज्योतीताई राणे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी नाशिक येथून जगद्गुरु शंकराचार्य धर्मपीठ काशी महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रचारक ह. भ. प. सुनील माळवे तथा भागवताचार्य जगद्गुरु शंकराचार्य सन्मानित ह. भ. प. राधाताई पाटील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे उपाध्यक्ष श्री नंदलाल भोलाने खजिनदार तथा शिवचरण उज्जैनकर सरांच्या अर्धांगिनी सौ. संगीता उज्जैनकर सचिन उज्जैनकर श्री सुनील मधोंकार व  पदाधिकारी आणि केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे  जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण उज्जैनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन प्रा. राजकुमार कांकरिया व सौ ज्योतीताई राणे यांनी केले तर आभार बहादरपूर येथील ट्रस्टी श्री भगवानराव अमृतकर सर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.