पत्रकार हा जनता-पोलीसांमधील दुवा : पोलीस निरीक्षक ईंगळे

0

जामनेर(प्रतिनिधी):-पत्रकार आणी पोलीस वेगळे राहुच शकत नाही,आपला “चोली दामन का साथ” हा नेहमीच सोबत असणे आवश्यक आहे,सकाळी-सकाळी चहा,नास्त्याच्या आधी वर्तमानपत्र वाचण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असतो.त्यातुन आपल्या परीसरातील किंबहुना दुरवर घडलेल्या असंख्य घटना माहित होतात,त्यामुळेच जनता आणी पोलीस प्रशासनातील “दुवा” असण्याचे कार्य पत्रकार करीत असल्याचे प्रतीपादन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे यांनी येथे केले.पत्रकारदिनाचे औचित्य साधुन पोलीस ठाण्यातफै सदर  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी पो नी ईंगळे बोलत होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विलास अहीरे,सुभाष माळी,सुनील माळी,अशोक चौधरी आदी कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.

विवीध संघटनांतर्फे पत्रकार दिनाचे कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बंगालसिंह चितोडीया  यांच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी अरवींद चितोडीयासह कार्यकर्ते,पदाधिकारी होते.

जिल्हापरीषदेच्या मराठी शाळेमध्ये जामनेर तालुका शिक्षक परीवारातर्फे आयोजीत कार्यक्रमाला गसचे संचालकद्वय संजय पाटील,अनील गायकवाड, मुख्याध्यापक एस डी पाटील,पि टी पाटील,समाधान बावीस्कर,संदीप पाटील,सलीम शेख,सोपान पारधी, गजानन गव्हारे,प्रदीप सोनवणे,योगेश चवरे, जुगलकिशोर ढाकरे,जितु नाईक,गजानन मंडवे,भरत तागवाले आदी शिक्षक होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले.

शहरातील ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोशिएशन, प्राईम फोटोग्राफर संघटना व तालुका फोटोग्राफर संघटनांच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाला संघटनेचे पदाधीकारी,आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामधे आयोजीत कार्यक्रमाला जेष्ठनेते संजय गरूड,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,विधानसभाक्षेत्र प्रमुख किशोर पाटील,जितेश पाटील,प्रभु झाल्टे,विनोद माळी,प्रल्हाद बोरसे,अनील बोहरा,जयेश बाफना,दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.