पत्रकार बी.एन.पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार”पुरस्कार प्रदान

0

भातखंडे  (प्रतिनिधी) : पत्रकार म्हटले की,समाजाचे उभेहुब प्रतिबिंब उमटवण्याचे काम ते करत असतात. असेच काम येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील भातखंडे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तथा दैनिक देशदूतचे पत्रकार बी एन पाटील हे गेल्या २२ वर्षांपासून करीत आहेत .गोदाकाठी वाढलेला दैनिक देशदूत गिरणाकाठी ग्रामीण भागात रुजवण्याचे  आणि त्यायोगे   ग्रामीण भागाच्या व्यथा आणि कथा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मांडून,  समाजातील खरे प्रश्न चव्हाट्यावर आणत असतात.विशेषतः  त्यात  कृषी,आरोग्य, सामाजिक शैक्षणिक राजकीय वा अन्य अशा विविध प्रश्नांवर नेहमीच लिखाण करत असतात आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.

त्यांच्या वैविध्यपूर्ण  लिखाणाची दखल २०१७ साली जळगाव जिल्हा पत्रकार संघाने घेतली होती. त्यावेळी त्यांना कृषी क्षेत्रावर लिखाण केले होते म्हणून “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. अशीच दखल ग्रीन फौंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घेतली असून त्यांनी त्यांच्या सर्व पांगी लेखनाची दखल घेतल्याने..त्यांना “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार” पुरस्कार “विजयादशमी” अर्थात “दसरा” या सणाच्या मुहूर्तावर “आदर्श पत्रकार पुरस्कार” देऊन  सन्मानित  करण्यात आलेले आहे. त्यांना हा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार” पुरस्कार मिळाल्याने भातखंडे सह परिसरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. असून विशेष अभिनंदन किसान शिक्षण संस्थेचे  चेअरमन प्रतापराव हरी पाटील, संस्थेच्या सचिव सौ. डॉ. पूनमताई पाटील, संस्थेचे संचालक प्रशांतराव विनायकराव पाटील सह शाळेतील मुख्याध्यापक सुनिल पाटील ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.