पंतप्रधान मोदी आज केदारनाथ दर्शनासाठी

0

उत्तराखंड :– लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले आहेत. मोदी केदारनाथला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरद्वारे पोहचले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मागील दोन वर्षात पंतप्रधान मोदींनी केदारनाथ येथे चार वेळेस भेट दिली आहे.

पंतप्रधानांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. पांरपरिक गढवाली पोषाख, कमरेला भगवा गमछा आणि पहाडी टोपी घालून पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. महापूरानंतर केदारनाथ येथे सुरू असलेल्या पुर्नविकासाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. केदारनाथ येथे रात्री मुक्काम केल्यानंतर पंतप्रधान रविवारी सकाळी बद्रीनाथ येथे पोहचणार आहेत. त्यानंतर रविवारीच दिल्लीत परतील.

Leave A Reply

Your email address will not be published.