पंतप्रधान आवस योजनेतंर्गत २२ लाभार्थीना ४० हजाराचा पहिला हप्ता मिळाला

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील २२ लाभार्थ्यांना ४० हजाराचा पहिला हप्ता पालिकेने दिल्याने लाभार्थिनी पेढ़े वाटून आनंद साजरा केला.  शहरातील पंतप्रधान आवास योजनेतंर्गत नगर पालिकेमार्फत एकूण ४८ लाभार्थ्यांना घर बांधकाम करणेसाठी परवानगी पत्र देण्यात आले होते त्यातील २२ लाभार्थ्यांनी आपले घराचे काम ओटा लेव्हल पर्यंत करून तसा नगर पालिकेला अर्ज केलेला होता.

नगरपालिका मुख्याधिकारी सौ करुणा डहाळे यांनी स्वतः बांधकामाची पाहणी करून ओटा लेव्हल पर्यंतचे काम झाल्याची खातरजमा केली त्यानंतर २२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४० हजार रुपयाचा पहिला हफ्ता जमा करण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांनी नगरपालिका कार्यालयात येऊन नगराध्यक्ष रमण भोळे यांना पुष्पगुच्छ देवून व पेढे भरवून अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक किरण कोलते, पिंटू ठाकूर ,देवा वाणी ,अजय नागराणी, दिनेश नेमाडे, निकी बत्रा उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.