पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी : निवडणूक अधिकारी निलंबित

0

भुवनेश्वर :- ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मोहम्मद मोहसिन असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना मंगळवारी त्यांच्या हेलिकॉप्टरमधील साहित्याची तपासणी केली होती.

विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी) सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरची तपासणी करू नये, असा स्पष्ट नियम केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिला आहे. तरीही निवडणूक प्रचार सभेसाठी ओडिशातील संबळपूरमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक निरीक्षक मोहम्मद मोहसीन यांनी तपासणी केली होती. अचानक घडलेल्या या तपासणीमुळे पंतप्रधानांचा जवळपास १५ मिनिटे खोळंबा झाला होता. यानंतर जिल्हाधिकारी व पोलिस महासंचालकांनी याबाबतचा अहवाल आयोगाला सादर केला होता. त्यानुसार कर्नाटक केडरचे सन १९९ ६च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या मोहसीन यांना आयोगाने निलंबित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.