पंकजा मुंडे, खडसे पक्ष सोडणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

0

मुंबई :  पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंसह काही भाजप नेते पक्षावर नाराज असून लवकरच पक्ष सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे भाजपावर नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. खडसे यांनी अनेकवेळा आपली नाराजी देखील व्यक्त केली असून त्यांनी भेटीगाठीही सुरु केल्या आहे. दरम्यान, “पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपाचेच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण असून मी जात आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दरम्यान, युतीबाबत आपण आशावादी असून भाजपा आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, उद्या स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून जयंतीची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी परळीत पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.