न.प.सहाय फंडाच्या थकीत रकमेसाठी ईश्वर रल यांनी अॅड.रोहीणीताईंकडे मांडली व्यथा

0

फैजपुर प्रतिनिधी: न.प.सहाय्य फंड थकित रक्कम कर्मचारी वर्गास मिळवून देण्यासंबंधी माजी मंत्री व राष्ट्रवादी चे नेते एकनाथराव खडसेंच्या माध्यमातून विषय मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय सफ़ाई मजदुर कांग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर रल यांनी नूक्तेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवा नेत्या अॅड.रोहिणी खडसे यांची भेट घेऊन ताई जवळ फैजपूर येथिल नगर पालिका कामगारांची समस्या मांडली व त्यांना या विषयी लक्ष घालण्याची विनंती केली.

महाराष्ट्र शासन तर्फे दिले जाणारे सहाय अनुदान फंड रक्कम फैज़पुर न.प.याना मागिल 3 महीने पासुंन मिळालेले नाही. शासनातर्फे अद्याप पर्यंत एकुण कमी मिळालेले अनुदान रक्कम 1,48,51,290 एक करोड़ अट्ठे चाळीस लाख एक्कावन हजार दोनशे नव्वद रुपए आहे.त्या करणाने कर्मचारी हवालदिल झाले आहे ,सदर नगर परिषद ही निम शहरी भागातिल असुन येथील कर्मचारी वर्गास उदरनिर्वाह चे दूसरे साधन नाहीं. आपली व परिवाराची उपजीविका नगर परिषद सेवेतुंन जे कही मानधन मिळते त्यावरच कर्मचारी पूर्ण करता.शासनाने सातवा वेतन आयोग लागू करुन वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे पन अद्याप त्यातिल फरक ची रक्कम मिळाली नहीं.काही कामगार सेवा निवृत्त होउन 3ते 4 वर्ष झाले त्यांची पन उत्पादन रक्कम मिळत नाहीं, त्यांच्या मुलांचे लग्नाचे वय निघत चालले आहे त्याकारणाने सर्व कर्मचारी मानसिक तनावाखाली जगत आहे.

तरी सदर सहाय अनुदान फंड शासन तर्फे मिळाले तर ही सर्व कामगार वर्गाची समस्या मार्गी लागू शकते,ही भूमिका ईश्वर रल यांनी आदरणीय रोहिणी ताई कड़े मांडली आहे.व या विषयाचे निवेदन युवा नेतृत्व रोहिणी ताई खडसे व आदरणीय नाथाभाऊ खडसे कड़े सादर केले आहे.सदर विषय लोकनेते श्री नाथाभाऊ व ताई साहेब यांचे मदत ने मार्गी लावणार असा विश्वास आहे.या  विषई आपला विविध मार्ग ने अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस तर्फे पाठपुरावा सुरू राहिल व कामगार वर्गास हक्क प्राप्त करुन देऊ.असा विश्वास यावेळी ईश्वर रल यांनी व्यक्त केला.तसेच भुसावळ येथील वाल्मीकी समाजाच्या नगरसेविका सोनिताई संतोष बारसे यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली जावी अशी देखील विनंती ईश्वर रल यांनी अॅड.रोहीणी खडसेंकडे निवेदनाद्वारे केली.

Leave A Reply

Your email address will not be published.