निपाणे सह परीसरात कैरीचे लोणचे बनवण्यात महिला व्यस्त

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात मुक्ती मिळाली आहे तसेच पेरणी आटोक्यात आली असल्याने रिकाम्या वेळात कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरू झाली आहे. लॉक डाऊन च्या काळात मार्केट बंद असल्यामुळे कच्ची कैरी विकणारे व्यापारी गावात येत असून ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री करत आहेत त्यामुळे महिला वर्ग एकाच वेळी कैरी खरेदी करण्यावर जोर देत असून मसालेदार पदार्थ टाकून लोणचे बनवतांना दिसत आहेत ग्रामीण भागात प्रत्येक महिला आपले लोणचे कसे स्वादिष्ट झाले यासाठी शेजारी पाजारी व गल्लीत वानगी देतात आता लोणचे तयार करण्याचे सिझन सुरू झाल्याने कैरी विकणारे व्यापारींची चांगलीच चांदी होत आहे.

मात्र, यावेळी कैरी घेत असताना कुणीही सोशल डिस्टन्सिग चे पालन करतांना दिसत नाही तसेच तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधतांना दिसत नाहीत त्यामुळे बाहेर गावातील लोकांमुळे गावात कोरोनाचा संसर्ग लागण्याचा संभव नाकारता येत नाही अशा बेजबाबदार वागणार्या लोकांवर पोलिस प्रशासनातर्फे कारवाई व्हावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.