निपाणे येथे अजूनही बरेच शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : काळ्या आईत दिवस रात्र राबून अवघ्या जगाचा पोशिंदा ठरणाऱ्या शेतकरी वर्गाचा विकास व्हावा म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून सबलीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

मात्र निपाणे येथे बरेच शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित असल्याचे पहावयास मिळले अनेक अशिक्षित शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी ग्रामसेवक यांच्या कडे शेतीचा ७/१२ जोडून आधार व बँक पास बुकची झेरॉक्स जोडून प्रकरणे दिली आहेत. परंतु अनेक शेतकरी सदर योजनेपासून वंचित आहेत दर महिन्याला हे अडाणी अज्ञानी शेतकरी सेंट्रल बँकेत मोदीचे पैसे माझ्या खात्यावर आले का? अशी विचारणा करण्यासाठी बँकेत जात असतात. मात्र, योजनाच लागू न झाल्याने लाभ कुठून मिळणार अनेक शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित राहात असल्याने सरकार माय बाप ने उर्वरित शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून द्यावा व शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने सुखी करावे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.