नारपार गिरणा योजना कार्यान्वित करा !

0

शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) :- नारपार दमण गंगा खोऱ्यातील नद्यांमधील वाहून जाणारे विशेषतः समुद्रात वाहून जाणारे दुर्लक्षित पाणी गिरणा नदी पाण्याच्या उगम स्थळी वळवून नाशिक धुळे जळगाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे कायापालट होऊन सुजलाम सुफलाम होईल व कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊन पिण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटेल दमणगंगा नारपार पिंजाळ खोऱ्यातील माधवराव चितळे समितीने 1998 मध्ये शासनाला अहवाल दिला 156 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते महाराष्ट्रातील जनतेचे सगळे पाणी आहे बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व जनतेची नारपार योजना कार्यान्वयीत व्हावी यासाठी जोरदार मागणी केली आहे

परंतु योजनेबाबत सकारात्मक पाऊल उचलले जावे अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे शेकडो कोटी रुपये निधी खर्च करून पाण्याचा प्रश्न तात्या सुरत सोडवला जातो तरीपण पाण्याची समस्या ही समस्याच राहात असते त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाला आहे या प्रश्न कायमस्वरूपी विचार म्हणजे नारपार दमणगंगा या पश्चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी केल्यास वाया जाणारी समुद्राकडे जाणारे पाणी उपलब्ध होऊन नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणासह पेठ सुरगाणा मार्गे गिरणा उगमस्थान मनमाड नांदगाव मालेगाव चाळीसगाव पाचोरा भडगाव पारोळा एरंडोल धरणगाव जळगाव अशा भागातील शेतकऱ्यांना खूपच फायदा होणार आहे जळगाव जिल्ह्यातील जामदा तामसवाडी धरण अंजनी म्हसवे धरण भोकरबारी धरण भालगाव धरणासह आधी प्रकल्प असून ाशिक धुळे जळगाव जिल्ह्यासह 82 हजार 800 हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना पेक्षा कायमस्वरूपी पिण्याचा सो सिंचनाचा व औद्योगिक करण करण्यासाठी लागणारा पाण्याचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा द्यावा असे निवेदन शेतकरी संघटनेने पारोळा येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष दत्तू पाटील युवा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील प्रवक्ता भिकनराव सर भटू पाटील नाना मिस्त् री सुमित पाटील नरेश चौधरी खुशाल राजपूत भूषण निकम वेदांत पाटील इत्यादी संघर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने हजर होते

Leave A Reply

Your email address will not be published.