नात्यांना सोन्याची झळाळी देणारा बाबूजींचा सपत्नीक नृत्याविष्कार

0

जळगाव 

एखाद्या कुटुंबातील लग्न म्हणजे नात्यांचा उत्सवच…यात आनंदाला उधाण आणि मनामनातल्या स्नेहाला उजाळा मिळतो..नात्यांची वीण घट्ट होते…हे तुमच्या आमच्या सर्वांच्याच लग्न कार्यात घडते…मात्र, असलं लग्न एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठित उद्योजकांकडे असेल तर त्याला वेगळी झळाळी प्राप्त होते. याचाच प्रत्यय येथील ‘आरएल’ या सुप्रसिद्ध सोन्याची पेढीचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी, माजी खा. ईश्वरबाबूजी जैन यांच्या नातू राजएैश्वर्य मनिष जैन याच्या लग्नानिमित्त आला…वयाची सत्तारी गाठलेल्या या आजी-आजोबांनी आपल्या नातूच्या विवाह निमित्त भुलेबिसरे गीतांच्या संगीतावर चक्क ठेका धरत नृत्याविष्कार सादर केला. ‘लक्ष्मीपुत्र’ असलेले बाबूजी आपलं मोठंपण विसरुन चक्क नाचतांना पाहणं म्हणजे दुर्मिळ योगच होता. हा आनंद उपस्थित आप्तेष्ठांनी डोळ्यात साठवून घेतला.

बाबूजींचा नातू म्हणजे माजी आ.मनिष जैन यांचे सुपूत्र राजऐश्वार्य याचा विवाह सोहळा जयपूर येथे संपन्न होत आहे…या निमित्ताने एक संगीत नृत्य मैफल रंगली होती…राजस्थानी परंपरेत ‘पिठी’ म्हणून हा रिवाजा प्रसिध्द आहे…याच ‘पिठी’त बाबूजींना सपत्नीक नृत्याचा आग्रह करण्यात आला… सर्वाच्या इच्छांचा नेहमीच आदर करणारे बाबूजीही स्वतःला रोखूशकले नाहीत…त्यांनी आपल्या धर्मपत्नही सौ.पुष्पा जैन यांना सोबत घेतले. आणि…

ओ मेरी जोहराजबी,

तुझे मालूम नही,

तू अभीतक है हसी,

और मै जवान…!

म्हणत, सौभाग्यवतीसह जी अदाकारी सादर केली त्याला तोड नाही… वय झालं, केस पांढरे झाले…शरीर थकलं तरी आपल्या माणसांच्या आनंदात मन मात्र जवानच असतं याचा प्रत्यय या दोघांच्या थिरकण्यात आला…असं म्हणतात, दुधापेक्षा दुधाची साय अधिक आवडते…नातू म्हणजे दुधावरची सायच नां…ती गोड लागणारच…उपस्थित टाळ्यांच्या ठेक्याने उत्स्फूर्त दाद देत उत्साह वाढवत असतांनाच वराच्या आजींनीही…

उडे जबजब जुल्फे तेरी,

कवारीयोंका दिल धडके…

या गीतावर साभिनय नृत्य करत बाबूजींना दमदार आव्हानच दिलं…बाबूजीही एकदम खूष होत नृत्यात सामिल झाले…आनंदाची उधळण करणारा हा क्षण लक्ष्मी-नारायणांची आठवण करुन देत होता…कुटुंबातील जेष्ठ मंडळी हीच घराची श्रीमंती असते…आपल्या आई-वडिलांचा हा अत्युच्च आनंदाने रंगलेला नृत्याविष्कार बघून मनिष जैन, अमरिश जैन हे दोघं भावंडही भावविभोर झाले होते…त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वहात होता.

असले प्रसंग म्हणजे जगण्याचा परमोच्च आनंदाचे क्षण असतात… या प्रसंगी माणुस आपली श्रीमंती, मोठेपण, पद, प्रतिष्ठा विसरुन आपल्या कुटुंबियात रममाण होतो…हे ज्याला विसरता येतं तोच नात्यांना समृध्द करु शकतो…नव्या पिढीसमोर आदर्श उभा शकतो…हल्ली घराघरात भिंती उभ्या राहून घरांची शकले होत आहेत…कुटुंब छोटी होत आहेत…या पाशर्वभूमीवर बाबूजींचा हा सपत्नीक नृत्याविष्कार नात्यांना सोन्याचांदीची झळाळी देणारा होता असंच म्हणावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.