नविन सरकारने ग्रा.पं.कर्मचा-यांचे प्रश्न सोडवावेत – अमृत महाजन

0

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा मारोती येथे ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा तालूका ग्रा.पं.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काॅ.कूंदन गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली व महासंघाचे राज्य सहसचिव अमृत महाजन व जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांचे मार्गदर्शन खाली घेण्यात आला.

कर्मचा-यांचे गेल्या 4/5 महिनेपासून पगार थकित असून ग्रामपंचायती आपल्या हिश्श्याचे वेतन,रहाणीमान भत्ता कर्मचा-यांच्या चे खातीत टाकत नाही.अशा तक्रारी केल्या नाडगाव ग्रामसेवकविरोधीही तोंडी तक्रारी केल्या आहेत.महाआघाडी सरकारने ग्रा.पं.कर्मचारी चे सरकारी कर्मचारी प्रमाणे वेतन व त्यासाठी 100% अनूदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करून अमृत महाजन यांनी कर्मचा-यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणे व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विक्रीच्या विक्रीच्या कृतीविरूद्ध आयोजित येत्या 8 जानेवारीच्या देशव्यापी संपात कर्मचा-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यावेळी संतोष खरे यांनी बोदवड तालूक्यातील कर्मचारीं या आंदोलनात 100% सहभागी होणार आहेत अशी ग्वाही दिली.तर कूंदन गायकवाड यांनी आभार मानले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी ठाकरे मधुकर जंगले,रविंद्र पाटील,सुभाष निळे संतोष धांडे,योगेश केणे,प्रवीण ठाकरे,सचिन पाटील,रवींद्र सपकाळे,संजय लोहार,रामभाऊ पाटील,सोपान पाटील,प्रवीण किंगे  यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.