कुऱ्हाडीने वार करून पतीने केली पत्नीची हत्त्या

0

खेडी येथील घटना

जळगाव : येथील जवळ असलेल्या खेडीमध्ये पतीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. सोनी समाधान सावळे (रा. खेडी) असे या मृत महिलेचे नाव असून समाधान सावळे असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसीमध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

याबाबत सविस्तर असे की,  खेडीतील आंबेडकर नगरात पती समाधान व पत्नी सोनी राहतात. हे दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र समाधान हा गेल्या काही दिवसापासून कामाला जात नसून या कारणावरून रात्री दोघात भांडण झाले. यातूनच  समाधान साळवे आणि घरात असलेल्या लोखंडी कुर्‍हाडीने पत्नी सोनीबाई तिच्या गळ्यावर जोरदार वार करून तिची हत्या केली आहे. घटनास्थळाहून पती समाधान साळवे हा फरार झाला असून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, संशयित आरोपी समाधान साळवे याचे वडील रमेश साळवे हा देखील खूनच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. मयताच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहेखून झाल्याची बातमी पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, दीपक कांडेलकर, राजेंद्र चौधरी आदी घटनास्थळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.