नवनिर्मिती प्रतिष्ठानतर्फे शहरात पाणी बॉटलचे वाटप

0

जळगाव | प्रतिनिधी 

गेल्या काही दिवसापासून जगासह भारताला लागलेल्या कोरोना आजाराचा फटका जळगाव शहराला ही बसलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील पोलीस दल व वैद्यकीय सेवेत कार्य करणाऱ्या व्यक्ती व शहरातील गरजूंना प्रतिष्ठानतर्फे दि.27 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत दररोज पेयजल- बिसलरी बॉटल चे वाटप शहरातील विविध ठिकाणी व ज्या परिसरातून मागणी येईल त्या परिसरात पाणी बॉटल वाटप करण्यात येणार आहे. आज पहिल्या दिवशी  श्री शिव प्रतिष्ठान व नवनिर्मिती प्रतिष्ठानतर्फे 120 पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले यावेळी पोलीस कर्मचारी व नवीन बस स्थानक परिसरातील प्रवासी, तसेच रस्त्याचा कडेला असलेले गरजू व्यक्तींनी याचा लाभ घेतला. यावेळी श्री शिव प्रतिष्ठानचे विशाल जगदाळे, स्वामी पोतदार, सागर दुसाने, नवनिर्मिती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संदीप महाले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.