कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मध्य रेल्वे सतत प्रयत्नशील

0

भुसावळ | प्रतिनिधी  

मध्य रेल्वे विविध ठिकाणी आवश्यक वस्तू आणि इतर मालवाहतूक चालू ठेवण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे आणि लॉकडाऊन दरम्यान त्याचे मानवी पैलू दिसून येते.

मुंबई विभाग: 

खालील माहितीसंदर्भात विक्रमी १५ लाख माहिती / संदेश पाठविले गेले आहेत.

• १४.४.२०२० पर्यंतच्या गाड्या रद्द करणे

• परतावा संबंधी लाभ ९० दिवसात घेता येऊ शकेल याबाबतचा संदेश.

• रिटायरींग रूमचे बुकिंग १४.४.२०२० पर्यंत अवरोधित केले आहे.

• २६.३.२०२० रोजी मुंबई विभागाने भारवहनाचे वार्षिक लक्ष्य १६.४५ मेट्रिक टन पार केले आहे.  अभूतपूर्व मुसळधार पावसाळा आणि कोरोना विषाणूचा परिणाम असूनही गेल्या वर्षीच्या १४.४५ मीलीयन टन (+१.५ मीलीयन टन) लोडिंगपेक्षा ही मोठी उडी आहे.

• यामुळे गेल्या वर्षीच्या १७०४.३४ कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत १८२२.५६ कोटी रुपयांचे लक्ष्य २५.३.२०२० रोजी १८२३ कोटी रुपयांवर पोचण्यास मदत झाली आहे.

• रेल्वे वसाहतींमध्ये

जंतुनाशकांची धूळ आणि फवारणी.

• फ्रेट गाड्यांची वेगवान आणि सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी ट्रॅकची कामे.

• तसेच आवश्यक अंतर (social distancing)  देखील राखले जात आहे.

भुसावळ विभाग

शेतीसाठी खत आवश्यक वस्तू आहे.  खांडवा येथे खताचे रेक अनलोड केले जात आहेत.

• पानेवाडी साइडिंग, मनमाड येथून पेट्रोलियम पदार्थांचे २ रॅक लोड केले जात आहेत.

नागपूर विभाग 

नागपूर विभागाच्या समर्पित केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे नागपूर विभागाने दि. २६.३.२०२० रोजी चालू आर्थिक वर्ष पूर्ण करण्यासाठी ५ दिवस शिल्लक असताना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न  मिळकत रु.  ३०७६.७३ कोटी चा टप्पा ओलांडला आहे.

• नागपूर विभागाने या आर्थिक वर्षात रू. ३०७८.७३ कोटी उत्पन्न मिळवले आहे आणि येत्या ५ दिवसांत ५० ते ५५ कोटी रुपये अधिक उत्पन्न अपेक्षित आहे.

• नागपूर विभागातील कर्मचार्‍यांनी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूर रेल्वे स्थानकातील रेल्वे सहाय्यकांना ५० पेक्षा जास्त किराणा साहित्याचे वाटप केले.

पुणे विभाग 

• गार्ड श्री विशाल काळगे यांनी घरी मास्क बनवले. घरात बनविलेले सदर १२०० नग मास्क गरम पाण्यात धुवून आणि स्वच्छतेनंतर नि: शुल्क वाटप केले जातील.  हे कोविड-१९ विरूद्ध एकत्र लढण्यात मध्य रेल्वेच्या  कर्मचा-यांची मानवी बाजू दर्शविते.

• कोविड-१९ या संसर्गजन्य  (साथीचा) आजाराचा सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला  उद्रेक लक्षात घेता, गुड्स शेडस् आणि साईडिंग्जवर सुरक्षाविषयक विविध सावधगिरी बाळगल्या आणि त्या लागू केल्या गेल्या आहेत.

• गुर मार्केट, कोल्हापूर, मिरज आणि भिलावडी येथे अनुक्रमे खत, अन्नधान्य व एलपीजी रॅक्सची अनलोडींग केली जात आहे.

• अनलोडिंग कार्य सुरू होण्यापूर्वी कामगारांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सल्ला देण्यात आला होता.  पुढील सूचना सुनिश्चित केल्या जात आहेतः

• पुरेसे अंतर राखले जात आहे.

• हातमोजे आणि मास्क घातलेले सुनिश्चित केले आहेत.

• सॅनिटायझरचा वापर.

• काम सुरू होण्यापूर्वी शरीराचे तापमान तपासणे.

• कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे.

सोलापूर विभाग: 

सोलापूर विभागीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचा-यांना वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) आणि रूग्णाला विलगीकरण कक्षात (वॉर्डात) कसे घ्यावे यासाठी प्रशिक्षण दिले गेले.  सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून संपूर्ण मॉक ड्रिल प्रशिक्षण दिले गेले.  प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई  येथून  जारी करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.