नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वेतुन पडुन अनोळखी इसमाचा मृत्यू

0

भडगांव- तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथील पुलाजवळ मुबंई कडुन भुसावळ कडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर खांब क्र. ३५४/२९ ते खांब क्र.३५४/३१ मध्ये धावत्या रेल्वेतुन पडुन अनोळखी इसम वय अंदाजे ३५ वर्ष याचा मुत्यु झाल्याने मयत स्थितीत आढळून आल्याचे रेल्वे कर्मचारी ट्रकमन सुजीत कुमार यांनी भडगांव पोलीस स्टेशनला ला खबर दिल्यावरून भडगांव पोलिस स्टेशनला अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड काॅन्सटेबल कैलास गिते हे करीत आहेत . बेवारस व अनोळखी इसमा बाबत माहिती मिळाल्यास भडगांव पोलिस स्टेशनला कळवावे असे आवाहन भडगांव पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.