धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

0

चंदीगड | भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे 91 व्या वर्षी निधन झाले आहे. पाच दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. या दोघां पती- पत्नीच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडाविश्वात आणि देशात शोककळा पसरली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत आदरांजली वाहिली आहे.

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केलं होतं. अखेर मिल्खा सिंग यांची प्राणजोत मावळली.

निर्मल सिंह या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या वर्षी शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.